Use APKPure App
Get The Nashik Herald old version APK for Android
नाशिक शहर के मीडिया जगत का एक विश्वसनीय, पारदर्शी और सार्वजनिक मुखपत्र
‘समानशीले व्यसनेशु सख्यम्’ या संस्कृतमधील सुभाषिताप्रमाणे समान विचारांच्या, ध्येयाच्या व्यक्ती एकत्र येऊन `दि नाशिक हेराल्ड’ या ऑनलाईन पोर्टलची मुर्हूमेढ रोवली गेली. नाशिक शहराच्या माध्यम विश्वातील एक विश्वसनीय, पारदर्शी आणि जनतेचे मुखपत्र असण्याच्या गरजेतून या नव्या ऑनलाईन अपत्याचा जन्म झाल्याचे दुसऱ्या भाषेत सांगता येईल. पेशाने व्यावसायिक असलेल्या श्री अमित बोरा या उमद्या, संवेदनशील आणि सजग व्यक्तीच्या कल्पनेतून `दि नाशिक हेराल्ड’च्या निर्माणाला गती मिळाली. मनातील विचार इतरांसमवेत बोलून दाखवण्याची नैसर्गिकता हा श्री अमित बोरा यांच्या स्वभावाचा जणू पैलू आहे. नाशिकच्या मातीशी इमान राखणाऱ्या माध्यमांमध्ये वेगळेपण राखणारे, विश्वसनीय आणि प्रसंगी व्यवस्थांची चिरफाड करणाऱ्या बातम्यांच्या वस्तूस्थितीधारित मांडणीचा साज चढवलेले एक वेब पोर्टल असावे, हा श्री अमित बोरा यांच्या विचाराचा पाया होय. आपल्या या विचाराला मूर्त स्वरूप देताना त्यांनी नाशिकच्या वृत्तपत्र सृष्टीतील अभ्यासू, अनुभवसंपन्न आणि नेतृत्वगुण लाभलेल्या श्री मिलिंद सजगुरे यांना सोबत घेतले आणि 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर `दि नाशिक हेराल्ड’ वेब पोर्टल अस्तित्वात आले.
माध्यम कोणतेही असो, त्याला व्यावसायिकतेची जोड लाभणे आजची अपरिहार्यता बनली आहे. या वेब पोर्टलमध्ये प्रबोधनाची आर्थिक मिळकतीशी सांगड घालण्यासाठी नाशिकच्या जाहिरात विश्वात विश्वासनीय नाव असलेल्या श्री सप्रेम बोरा यांना `दि नाशिक हेराल्ड’ परिवारात सामावून घेण्यात आले आहे. जाहिरात विश्वातील तब्बल चार दशकांचा समृध्द अनुभव असलेल्या श्री बोरा यांना उत्तर महाराष्ट्रातील पहिले व्हिडीओ चॅनल सुरू करण्याचा बहुमान प्राप्त आहे. डिजीटल मिडीया अभावानेच अस्तित्वात असलेल्या काळात अर्थात पंचवीस वर्षांपूर्वी दूरदृष्टीने त्यांनी तसा निर्णय घेतला होता. माध्यमांशिवाय जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गानायझेशन (जीतो). जाहिरातदारांची `नावा’, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे संस्थापक विश्वस्त, श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याचे विश्वस्त आदी सामाजिक व सांस्कृतिक संस्थांसोबत त्यांचा निकटचा संबंध आहे.
समविचारींच्या या मित्रमेळ्यात आणखी एका बहुआयामी व्यक्तीमत्वाची भर पडते ती श्री किशोर अहिरे यांची. व्यावसायिक अंगाने मार्गदर्शक म्हणून र्दि नाशिक हेराल्ड’ परिवाराशी जोडल्या गेलेल्या श्री अहिरे यांचा आजवरचा प्रवास समृध्द राहिला आहे. `बिझनेस माईंडेड’ असलेल्या श्री अहिरे यांचा अतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील अभ्यास शब्दांपलीकडील आहे. `हाऊस खास’ या घरे व सदनिका सेवांशी निगडीत ब्रॅण्डचे ते चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. शिक्षण, परवडणारी घरे, अतिथ्य, टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स आदी क्षेत्रांतील त्यांचा अभ्यासही आचंबित करणारा आहे. जगभरातील अनेक देश फिरलेल्या श्री अहिरे यांचे ज्ञानसंचित आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक ठरू शकण्याइतपत प्रगल्भ आहे. इको-टुरिझम क्षेत्रातील त्यांचा अभ्यास अनेक राज्यांच्या सल्लागार पदापर्यंत पोहचवण्यास त्यांना कामी आला आहे. टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स क्षेत्रातील व्यावसायिक मॉडेल्स बनवण्याच्या दृष्टीने ते विविध राज्य शासनांचे मार्गदर्शक ठरले आहेत.
धार्मिकस्थळ आणि कृषीपंढरी म्हणून ख्याती असलेल्या नाशिकचा आज चौफेर विकास झाला आहे. या शहराची कक्षा पळी-पंचपात्रापुरता मर्यादित न राहता पाहता-पाहता हे शहर जगातील द्रुतगतीने विकसित होत असलेल्या शहरांच्या क्षितीजावर स्थान मिळवून आहे. कुंभमेळ्याचे शहर, गुलाबांचे शहर, द्राक्षनगरी असा प्रवास करणाऱ्या या शहराच्या शिरपेचात `वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ चा मानाचा तुरा खोवला गेलाय. हा समृध्द वारसा जपताना नाशिकने कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा नाना क्षेत्रांमध्ये साधलेली प्रगतीही डोळ्यात भरणारी आहे. नाशिकची लौकिकार्थाने असलेली श्रीमंती वृध्दींगत करण्याच्या उदात्त हेतूने `दि नाशिक हेराल्ड’ ची वाटचाल राहणार आहे. नाशिककरांच्या पसंतीचे शिक्कामोर्तब प्राप्त करण्याबाबतही आम्ही खात्री बाळगून आहोत. काळानुरूप बदल स्विकारणे हा आमच्या वाटचालीचा पाया असेल. त्यामध्ये नाविन्याचा अंगीकार, मान्यवरांच्या विधायक सूचनांचा अंमल, तंत्रज्ञानात्मक बदल आदी मुद्यांचा समावेश राहील.
सामान्य व्यक्ती केंद्रीभूत ठेवण्याचा आमचा दृष्टीकोन अधिक व्यापक बनवण्याच्या आमच्या निर्धाराला नाशिककर कवेत घेऊन `आपले हक्काचे वेब पोर्टल’ म्हणून स्विकारतील, असा दुर्दम्य आशावाद बाळगण्यात अतिशयोक्ती नसावी, एवढेच यानिमित्ताने…
Android ज़रूरी है
5.0 and up
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Apr 30, 2021
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
The Nashik Herald
1.0 by Nachiketa Software
Apr 30, 2021